
जळगाव (प्रतिनिधी): उर्दू शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांसाठी भारतभर कार्यरत असलेली अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ १११३८ ही संघटना जळगाव जिल्हा हायस्कूल कार्यकारी परिषद स्थापन केली. या संदर्भात, मंगळवार, दिनांक १३ मे रोजी जळगाव येथील अँग्लो-उर्दू हायस्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक साजिद निसार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली एक शैक्षणिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
ज्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्राथमिक जळगाव मोहसीन खान यांनी ध्येय आणि उद्दिष्टे मांडली. , नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष तय्यब इब्राहिम शेख, विभाग उपाध्यक्ष जहीर अहमद जहीर , विभाग संपर्क प्रमुख शाहिद फरहान, सल्लागार शेख इम्रान आसिफ या सर्वांच्या प्रयत्नांनी झालेली ही शैक्षणिक सभेमध्ये ,
जळगाव जिल्हा हायस्कूलच्या कार्यकारणी समितीसाठी , शेख जाकीर बशीर उपशिक्षक इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये यांना अध्यक्ष पद देण्यात आले.
एरंडोल येथील मुश्ताक अहमद अब्दुल मनाफ नॅशनल उर्दू गर्ल्स हायस्कूलची यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली आणि धरणगाव येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुश्ताक अली मोहब्बत अली यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली. बैठकीत धरणगाव येथील अँग्लो उर्दू स्कूलचे मोहसीन शाह अकील शाह यांची उपाध्यक्षपदी, एरंडोल येथील शेख अझरुद्दीन शहाबुद्दीन अँग्लो उर्दू हायस्कूलचे उपाध्यक्षपदी आणि यावल येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे अर्शद खान हमीद खान शिकलकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बैठकीत, अल-हिरा उर्दू हायस्कूल, भुसावळ येथील अल्तमश खान हनीफ खान यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली, तर डॉ. अनिसुद्दीन अलाउद्दीन शेख, इकरा उर्दू हायस्कूल, सालार नगर, जळगाव यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली.शरीफ खान अयुब खान अँग्लो उर्दू हायस्कूल जळगाव यांना प्रसारण विभाग देण्यात आला. मुनीर शेख तस्लीम शेख रजाक नॅशनल उर्दू हायस्कूल एरंडोल, शिक्षिका नेता, जिया-उन-निसा गुलाम दस्तगीर,इकरा पब्लिक हायस्कूल मोहाडी जळगाव ,महिला प्रतिनिधी, मुमताज अत्ताउल्ला खान, इकरा शाहीन उर्दू हायस्कूल जळगाव, महंमद वसीम मुहम्मद जमील, वाय.एम. खान उर्दू हायस्कूल भडगाव समन्वयक, साजिद खान रफीक खान, मिल्लत हायस्कूल जळगाव, समन्वयक यांची निवड झाली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संस्थेचे संस्थापक साजिद निसार अहमद आणि पाहुण्यांनी निवडीचे पत्र दिले. या बैठकीत विभागाचे नवनिर्वाचित सदस्य, नवनिर्वाचित मुख्याध्यापक, नवनिर्वाचित केंद्रप्रमुख, नवनिर्वाचित पतपेढी सदस्य सलीम शेख आणि नवनिर्वाचित पतपेढी सदस्य मुश्ताक अली यांचे स्वागत करण्यात आले.
विशेष पाहुणे म्हणून अशफाक खान राष्ट्रीय अध्यक्ष, रिजवान चमन शेख अध्यक्ष महाराष्ट्र, शेख इलियास असगर उपाध्यक्ष महाराष्ट्र, डॉ.नूर इलाही शाह नाशिक विभाग अध्यक्ष, अब्दुल करीम सालार अध्यक्ष इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव, इजाज अहमद अब्दुल गफ्फार मलिक अध्यक्ष, अंजुमन तालीम मुस्लिमीन जळगाव, फारूक शेख अध्यक्ष, मन्यार बिरादरी जळगाव, मिर्झा रिजवान जिल्हा अध्यक्ष नाशिक जिल्हा अध्यक्ष हाजी शहजाद अली सय्यद अध्यक्ष मध्य प्रदेश प्राथमिक व इतर पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमात मुश्ताक अली यांनी कुराण पठण केले,
अझरुद्दीन शेख यांनी नात सादर केली, जहीर अहमद झहीर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार प्रदर्शन समारंभ इम्रान आसिफ यांनी सादर केला.