खान्देशजळगांव

जळगाव पोलिस दलात मोठा फेरबदल; तीन निरीक्षकांना नवीन जबाबदाऱ्या

जळगाव पोलिस दलात मोठा फेरबदल; तीन निरीक्षकांना नवीन जबाबदाऱ्या

जामनेर, जिल्हापेठ ठाण्यांना नवे प्रभारी; आर्थिक गुन्हे शाखेचीही जबाबदारी बदलली

जळगाव : जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय कारणास्तव तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ६ सप्टेंबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले. या बदलामुळे जामनेर व जिल्हापेठ पोलिस ठाण्यांना नवे प्रभारी मिळाले असून, आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारीही नव्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे.

आदेशानुसार रायगड येथून हजर झाल्यानंतर पोलिस निरीक्षक निवृत्ती भिमराव बो-हाडे यांची जामनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा येथून हजर झाल्यानंतर पोलिस निरीक्षक शरद उत्तमराव शेवाळे यांची जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, पोलिस निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा, जळगावच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रशासकीय कारणास्तव बदल
महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या अधिकाराचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नव्या ठिकाणी नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश
बदली किंवा नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन ठिकाणी तातडीने हजर होऊन कर्तव्यावर रुजू व्हावे आणि त्याचा अनुपालन अहवाल सादर करावा, असेही पोलिस अधीक्षक कार्यालयाने आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button