इतर

मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी व्यापाऱ्यास लुटले ! 

मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी व्यापाऱ्यास लुटले ! 

दोन मोबाईलसह २ लाख ४१ हजाराची रोकड लांबवली

चाळीसगाव : दुकान बंद करून मोटारसायकलवर घरी जात असलेल्या व्यापाऱ्याचे मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर बॅगेत ठेवलेले २० हजार रुपये किंमतीचा आय फोन ११ व १० हजार रुपये किमतीचा वन प्लस मोबाईल फोन तसेच २ लाख ४१ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल युनिकॉन मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हिसाकावून पोबारा केल्याची घटना शहरातील गवळी वाडा, राठोड हॉस्पीटल रोडवर दि. ३१ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घ घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दोघा चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, उद्देश विनोद कोठारी रा. चाळीसगाव हे किराणा दुकानदार दि.३१ रोजी किराणा दुकान बंद करून रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवर घरी जात असताना शहरातील गवळी वाडा व राठोड हॉस्पीटलच्यामध्ये काळ्या रंगाची युनिकॉन एमएच १५ ९२६९ ह्या मोटारसायकलवर दोन जण आले, पाठीमागे बसलेल्या डोक्यात लाल रंगाची टोपी व अंगात मरून रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने व्यापाऱ्याच्या

गाडीच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली बॅग हिसकावून पळ काढला. व्यापाऱ्याने एस मार्टकडून अंधशाळे पर्यंत दोघांचा पाठलाग केला पण ते भडगाव रोडने पळुन गेले.

या घटनेची माहिती चाळीसगाव पोलिसांना सांगितल्यावर नाईट ड्यूटीवरील पोलिसांनी भडगाव रोडवरील पातोंडापर्यंत त्यांचा शोध घेतला मात्र दोघे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

चोरांचा पाठलाग करत असतांना गाडीवरुन घसरून पडल्याने उद्देश कोठारी यांच्या उजव्या पायाला व गुडघ्याच्या वाटीला मार लागल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु आहे. व्यापाऱ्याचे काका संदीप पारसमल कोठारी व्यवसाय किराणा दुकान रा. शुभम पॅलेस लक्ष्मीनगर देवकर मळ्याजवळ चाळीसगाव ह.मु. रा. तिरुपती नगर रोहीणी अपार्टमेन्ट देवपुर ता. जि धुळे यांच्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात आरोपी विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास योगेश माळी करीत आहेत.चाळीसगाव (प्रतिनिधी) –
शहरातील गवळी वाडा, राठोड हॉस्पिटल रोडवर ३१ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास किराणा व्यापारी उद्देश विनोद कोठारी यांच्या मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवरील बॅग हिसकावून दोन चोरट्यांनी पळ काढला. बॅगेत २० हजारांचा आयफोन ११, १० हजारांचा वन प्लस मोबाईल आणि २ लाख ४१ हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल होता. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

उद्देश कोठारी हे ३१ मे रोजी रात्री ९ वाजता दुकान बंद करून मोटारसायकलवर घरी निघाले होते. गवळी वाडा ते राठोड हॉस्पिटल रोड दरम्यान, काळ्या रंगाच्या युनिकॉन मोटारसायकलवर (MH 15 9269) आलेल्या दोन चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या तरुणाने, ज्याने लाल टोपी आणि मरून शर्ट घातला होता, त्याने कोठारी यांच्या गाडीच्या पेट्रोल टाकीवरील बॅग हिसकावली आणि पळ काढला. कोठारी यांनी एस मार्ट ते अंधशाळेपर्यंत चोरांचा पाठलाग केला, परंतु चोरटे भडगाव रोडने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी भडगाव रोडवरील पातोंडापर्यंत शोध घेतला, पण चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पाठलागादरम्यान कोठारी यांची मोटारसायकल घसरल्याने त्यांच्या उजव्या पायाला आणि गुडघ्याला दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत.

कोठारी यांचे काका संदीप पारसमल कोठारी (रा. शुभम पॅलेस, लक्ष्मीनगर, चाळीसगाव, मूळ रा. तिरुपती नगर, रोहीणी अपार्टमेंट, देवपूर, धुळे) यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस कर्मचारी योगेश माळी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button