इतर

जळगावात लोक संघर्ष मोर्चाचा “बिर्हाड मोर्चा” उद्या; जमिनीपासून शिक्षणापर्यंत १२ मागण्यांसाठी हजारोंचा एल्गार

जळगावात लोक संघर्ष मोर्चाचा “बिर्हाड मोर्चा” उद्या; जमिनीपासून शिक्षणापर्यंत १२ मागण्यांसाठी हजारोंचा एल्गार

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात उद्या शुक्रवार, दिनांक १३ जून २०२५ रोजी “लोक संघर्ष मोर्चा”च्या वतीने “बिर्हाड मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता खानदेश मॉल येथून सुरू होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असून, हजारो आदिवासी, महिलावर्ग, शेतकरी, युवक आणि विद्यार्थी या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मोर्चामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे जमिनीवरील हक्क, घरकुल, मोफत रेशन, जातीच्या दाखल्यांचे सुलभीकरण, आरक्षण, रोजगार, शिक्षण आणि आदिवासी समाजास न्याय मिळवून देणे. मोर्चाचे आयोजक म्हणतात, “ही केवळ मागण्यांची नव्हे, तर आमच्या अस्तित्वाची लढाई आहे!”

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे

पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या जमिनीचे मोजमाप करून मालकी हक्क मिळावा, घरकुलासाठी ₹२.५ लाखांचे थेट अनुदान द्यावे, आदिवासींना मोफत रेशन व रेशनकार्ड अद्ययावत करावेत, जातीच्या दाखल्यासाठी एकच पुरावा ग्राह्य धरावा, OTSP क्षेत्रासाठी स्वतंत्र सर्वेक्षण व विशेष योजना राबवाव्यात, आदिवासी तरुणांना रोजगार हमी योजनेत प्राधान्य मिळावे, दलित व आदिवासी वस्त्यांत स्वतंत्र बालवाड्या व अंगणवाड्या सुरू कराव्यात, २०११ ची जनगणना कालबाह्य झाल्याने नव्याने सर्वेक्षण करावे, ऊसतोड व बांधकाम मजुरांना ₹४ लाखांचे घरकुल अनुदान मिळावे, जळगाव लोकसभा मतदारसंघात आदिवासी प्रकल्प कार्यालय स्थापन करावे, महिलांच्या बचतगटांना बिनव्याजी कर्ज व अनुदान द्यावे, भिल्ल विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये वसतीसह प्रवेश मिळावा.

मोर्चा मार्ग:

खानदेश मॉल (सुरुवात) → टॉवर चौक → जुना बस स्टॉप → जी.एस. ग्राउंड → नवीन बस स्थानक → जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.

या मोर्चात पारंपरिक वेशभूषेत सहभागी आंदोलक माईकच्या साहाय्याने आपले मुद्दे मांडणार असून, शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत आंदोलन केले जाईल.

या मोर्चाचे नेतृत्व प्रतिभा शिंदे, सचिन धाडे, कैलास मोरे, राणा चौव्हाण, सूनिल मोरे, शंकर भिल, उत्तम भिल, गणेश सुर्यवंशी, दादा भिल, नरेश चव्हाण, ताराचंद बारेला, इरफान तडवी हे करत असून, लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे.

ठिकाण : जी.एस. ग्राउंड, जळगाव
दिनांक : १३ जून २०२५, शुक्रवार
वेळ : सकाळी ११:०० वाजता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button