
राज्य सेपक टकरॉ स्पर्धेत जळगाव जिल्हा उपविजेता
नांदेड : महाराष्ट्र राज्य सेपक टकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने व नांदेड जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान घेण्यात आलेल्या २५व्या सब-ज्युनिअर व २६व्या ज्युनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. टीम इव्हेंट व रेगू इव्हेंटमध्ये झळकलेल्या कामगिरीमुळे जळगाव संघाने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
संघाचे नेतृत्व कर्णधार शेख फैजान रईस यांनी केले. प्रशिक्षक म्हणून मिर्झा आसीफ इकबाल, सहाय्यक प्रशिक्षक आमीर खान व फैजान शेख तर व्यवस्थापक म्हणून इमरान शेख, मोहसीन पिंजारी व दानिश खान यांनी योगदान दिले.
या यशाबद्दल केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री ना. रक्षा खडसे, राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश सोनवणे आदींसह जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, मनपा आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर ढेरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अशोक नखाते यांनी संघाचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष हाजी एजाज गफ्फार मलीक, उपाध्यक्ष प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, सचिव इकबाल मिर्झा व इतर मान्यवरांनीही संघाचे कौतुक केले.
ज्युनियर मुलांच्या संघात शेख फैजान रईस (कर्णधार), सय्यद शिकेब, सय्यद ऊवेस, उमर जिया बागवान, बागवान मोहम्मद हम्माद, शेख रेहान, तंबोली मोहम्मद अदनान, फुरकान खान, खातीब रयान, अरफात बागवान, शेख तनवीर, शेख सोहेल, खान अफ्फान, रुद्राक्ष देठे व अनस शेख यांचा समावेश होता.
जळगावच्या मुलांनी केलेल्या या शानदार कामगिरीमुळे जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राज्यभर गाजले आहे





