चाळीसगाव ;-तू मला आवडत नाही मला तुझ्यात काहीही रस नाही मला फोरविलर गाडी घेण्यासाठी तू तुझ्या माहेरून आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आणावे या मागणीसाठी पतीने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध मेहुनबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की श्रद्धा कुणाल कोठावदे वय 26 राहणार उंबरखेड तालुका चाळीसगाव येथे माहेर असलेल्या विवाहितेचा विवाह पती कुणाल भास्कर कोठावदे याच्याशी झाला होता. मात्र विवाह झाल्यानंतर 19 मार्च 2022 ते 24 मार्च 2023 दरम्यान पती कुणाल कोठावदे याने तुम्हाला आवडत नाहीस मला तुझ्यात काही रस नसून मला फोरविलर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत अशी मागणी करून चापटा बुक त्यांनी मारहाण करीत पाच लाख रुपये नाही दिल्यास तुला नांदवणार नाही आणि दुसरे लग्न करून घेईल अशी दमदाटी देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती कुणाल भास्कर कोठावदे ,सासु वैशाली भास्कर कोठावदे, सासरा भास्कर जगन्नाथ कोठावदे ,चुलत सासरा नरेंद्र जगन्नाथ कोठावदे, नंदोई प्रणय घनश्याम मालपुरे, ननंद पुनम प्रणय मालपुरे ,सर्व रा. ओझर, ता. नाशिक यांच्याविरुद्ध विवाहितेने फिर्याद दिल्यावरून मेहुनबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कुशल शिंपी करीत आहे.