खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव पोलिसांची जिल्हाभर धडक नाकाबंदी; ३९९ वाहनचालकांवर कारवाई

जळगाव पोलिसांची जिल्हाभर धडक नाकाबंदी; ३९९ वाहनचालकांवर कारवाई

फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, विनालायसन्स वाहनधारकांवर पोलिसांचा वचक

जळगाव | प्रतिनिधी आगामी कायदा व सुव्यवस्था तसेच मालमत्तेविषयक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हाभर विशेष नाकाबंदी मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळातील अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच विविध विभागीय शाखांतील अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

या विशेष मोहिमेत ३९ पोलीस अधिकारी आणि १९२ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेत एकूण ३९९ प्रकरणांमध्ये कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अशा प्रकारे झाली कारवाई
फॅन्सी नंबर प्लेट : ४४ प्रकरणे
विनानंबर प्लेट वाहने : ७८ प्रकरणे
ट्रिपल सीट वाहनचालक : १०६ प्रकरणे
विनालायसन्स वाहनचालक : ९४ प्रकरणे
ड्रंक अँड ड्राईव्ह : ८ प्रकरणे
वाहन जप्त : १

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहनचालना करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button