खान्देशगुन्हेजळगांव

यावल-किनगाव रस्त्यावर अवैध कोळसा वाहतूक उघड; ट्रक वन विभागाकडून जप्त

यावल-किनगाव रस्त्यावर अवैध कोळसा वाहतूक उघड; ट्रक वन विभागाकडून जप्त

यावल : यावल-किनगाव मार्गावर वन विभागाने अवैध कोळसा वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत कोळसा भरलेला ट्रक जप्त केला. ही कारवाई २१ मे रोजी रात्री गस्तीदरम्यान करण्यात आली असून वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.

वन विभागाच्या माहितीनुसार, यावल पश्चिम आणि हरिपुरा राऊंडचे अधिकारी व कर्मचारी यावल-किनगाव रस्त्यावर नियमित गस्त घालत असताना संशयित ट्रक (एमएच १९ सीएक्स ४१४९) थांबवून तपासण्यात आला. तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

यावेळी संबंधित चालकाकडे कोळसा वाहतुकीसाठी आवश्यक पास अथवा परवान्याची मागणी करण्यात आली. मात्र कोणतेही वैध कागदपत्र सादर करता आले नाही. कारवाईची चाहूल लागताच चालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला. त्यानंतर वन विभागाने ट्रक ताब्यात घेत जप्तीची कारवाई केली.

ही कारवाई उपवनसंरक्षक सौरीष सहाय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच समाधान पाटील, प्रशांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली संजय इंडे, सुधीर पटणे, योगेश मुंडे, सरला भोंगरी आणि वनसेवकांच्या पथकाने सहभाग घेतला. अवैध कोळसा वाहतुकीबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button