खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात मुस्लिम समाजाचे निवेदन; आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईची मागणी

जळगावात मुस्लिम समाजाचे निवेदन; आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर मुस्लिम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जळगाव शहरातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी तथा संबंधित पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नाजिया इलाही यांनी सोशल मीडियावर मुस्लिम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) यांच्याविषयी अवमानकारक व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य तसेच पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून समाजातील विविध घटकांमध्ये तेढ, द्वेष व असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर कृत्य हे समाजात वैमनस्य निर्माण करणारे तसेच सार्वजनिक शांतता व सलोखा बिघडविणारे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील संबंधित तरतुदी तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

समाजात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा मुस्लिम समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button