खान्देशजळगांवसामाजिक

इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जळगाव: इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मेहरूण, जळगाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात आसिफ इक़बाल शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास आसिफ इक़बाल शाह यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून झुबेर मलिक, प्राचार्य एच.जी.एन. आए.टी.आए उपस्थित होते. तसेच शाळेचे प्राचार्य रियाज शाह सर, पर्यवेक्षक जाकीर बशीर सर, सुहैल अमीर सर, अतीक खान सर आणि मेहरुन्निसा मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थी अरहम रफीक शेख, राफे इर्तेकाज, अबू बकर रफीक शाह, झिनेरा सज्जाद खान, उम्मे हबीबा आणि आयशा शेख लईक यांनी स्वातंत्र्यदिन व देशभक्तीपर विषयांवर प्रभावी भाषणे केली. तसेच झैनब व समूह आणि तसबिना व समूह यांनी देशभक्तीपर गीते सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.

प्रमुख पाहुणे झुबेर मलिक सर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह वाढवला. आसिफ शाह इक्बाल शाह यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून सांगत चांगल्या सवयी अंगीकारून जीवन जगण्याचा संदेश दिला. सुहैल अमीर सर यांनी स्वातंत्र्याचा इतिहास व स्वातंत्र्यलढ्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात शाळेचे प्राचार्य रियाज शाह सर यांनी विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी आपल्या जीवनाचा भाग बनवाव्यात, शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करावे आणि मेहनत व शिस्तीच्या जोरावर जीवनात यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इफ्तिखार शेख सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक जाकीर बशीर सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शाळेचा परिसर देशभक्तीच्या उत्साहाने आणि जोशाने भारलेला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button