खान्देशगुन्हेजळगांव

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

जळगाव, प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे  १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात आला. शहरातील केमिस्ट भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.

याप्रसंगी शहराच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, कॉन्ट्रॅक्टर संभाजीराव जाधव, प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधिपाल वानखेडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

छायाचित्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.. – महापौर दीपमाला काळे
धकाधकीच्या जिवनात छायाचित्रकांरांची धावपळ प्रचंड वाढली आहे. त्यामुळे येणा-या काळात प्रत्येक छायाचित्रकाराने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला महापौर दीपमाला काळे यांनी केली. त्याचप्रणाणे भविष्यात प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविल्या जाणा-या प्रत्येक चांगल्या कामात महापालिकेतर्फे वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी सुमित देशमुख, हेमंत पाटील जळगावकर, अभिजीत पाटील, सचिन पाटील, अरूण इंगळे, प्रकाश लिंगायत, जुगल पाटील, पांडुरंग महाले, भूषण पाटील, धर्मेंद्र राजपूत, भुषण हंसकर, गोकुळ सोनार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभिजीत पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने आजी-माजी वृत्तपत्र छायाचित्रकार, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधीसह शहरातील इतर सर्व फोटोग्राफर मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button