खान्देशगुन्हेजळगांव

इच्छादेवी चौकात पोलिसांचा धडक ट्रॅफिक अॅक्शन; एसपी धिवरे स्वतः रस्त्यावर

इच्छादेवी चौकात पोलिसांचा धडक ट्रॅफिक अॅक्शन; एसपी धिवरे स्वतः रस्त्यावर

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी जळगाव पोलिसांनी वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून इच्छादेवी चौकात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली.

हेल्मेटपासून सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाई

इच्छादेवी चौकात झालेल्या कारवाईदरम्यान हेल्मेट न वापरणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, सिग्नलचे उल्लंघन आणि चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणे अशा विविध वाहतूक नियमभंगांवर पोलिसांनी कारवाई केली.

यावेळी पोलीस अधीक्षक धिवरे यांनी वाहनचालकांशी संवाद साधत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. नियम हे केवळ दंडासाठी नसून प्रत्येक वाहनचालकाच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन गरजेचे

दुचाकीस्वारांनी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, तर चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच निर्धारित वेगमर्यादेतच वाहन चालवून सिग्नल आणि इतर वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

जनजागृतीवरही पोलिसांचा भर

या मोहिमेचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे नसून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करणे हाही आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरल्याने वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होत असल्याचे चित्र इच्छादेवी चौकात पाहायला मिळाले.

जळगाव शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, हेल्मेटचा नियमित वापर करावा आणि सुरक्षित वेगाने वाहन चालवावे, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button