खान्देशगुन्हेजळगांवराजकीय

भाजपा कार्यालय येथे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते झेंडावंदन

जळगाव l देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे जळगाव शहाराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे {राजूमामा} यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता झेडांवदन करण्यात आले तसेच भारत मातेचे पूजन जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ह भ प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्तेकरण्यात आले. या प्रसंगी आ राजूमामा भोळे यांनी देशासाठी बलिदान केलेल्या स्वातंत्र्य वीरांना नमन केले.व केंद्रातील ,राज्य शासनाने केलेल्या जनकल्याण कारी योजनांची माहिती दिली. व देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जळगाव लोकासभा प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी यांनी पंचप्राण प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर युवा मोर्चा च्या वतीने भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली आयोजन करण्यात आली होती सदर रॅली वसंत स्मृती भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्राउंड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला (पूतळ्याला) माल्यार्पण करून संपन्न झाली तिरंगा रॅलीत जळगाव लोकसभेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जळगाव ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), महानगर जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, शहर विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी, गटनेते राजेंद्र घुगे पाटील,माजी महापौर सीमाताई भोळे, प्रदेश महिला चिटणीस श्रीमती. रेखाताई वर्मा, महेश जोशी, नितीन इंगळे,युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या सह भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे सर्व नगरसेवक, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा/आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button