छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचा प्रथम दर्शन सोहळा उत्साहात


छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचा प्रथम दर्शन सोहळा उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : क्रांती चौक, छत्रपती शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. श्री गणेशोत्सव २०२६ निमित्त आयोजित प्रथम दर्शन सोहळ्यात परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
प्रथम दर्शन सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष अमर दत्तराजसिंह राजपूत, महानगरप्रमुख संतोष पाटील, समाजसेवक चेतन आळंदे, समाजसेवक गोलू मराठे तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त उपस्थित होते. गणरायाच्या दर्शनाने आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
श्री गणेशोत्सव २०२६ साठी मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी अमर दत्तराजसिंह राजपूत, उपाध्यक्षपदी नरेंद्र दिलीप शिंदे, सचिवपदी राहुल रमेश पाटील, उत्सव प्रमुखपदी विनोद रामदास वारे, खजिनदारपदी दिव्येश सुनील चौधरी, उपखजिनदारपदी कौशल दिलीप भोसले, सहसचिवपदी रितेश आनंदा जाधव आणि कार्याध्यक्षपदी योगेश संजय कदम यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पुष्पक पवार, कैशाल शर्मा, भैय्यू शर्मा, हर्षल कोरडे, धनंजय कंडारे, केयूर पंधरे आणि यश चौधरी यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस असून, परिसरातील नागरिकांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




