जळगाव l भडगाव प्रतिनिधी l भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दहा टायर डंपर व ट्रॅक्टर वर दि २२रोजी मध्यरात्री भडगाव महसुल विभागाचा पथकाने करवाई करत दोन्हीही वाहने जप्त केले आहे.
या बाबत अधिक महिती अशी की, तालुक्यातील भट्टगाव व भडगाव येथील गिरणा नदी पात्रातून अनधिकृत पने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर पकडण्यात आले. हे दोन्हीही वाहने भडगाव शासकीय विश्राम गृह या ठिकाणी जमा करण्यात आले आहे. ही कारवाई भडगाव महसूल विभागाच्या पथकातील तहसिलदार मुकेश हिवाळे, मंडळअधिकारी शेजवलकर आप्पा, तलाठी राहुल पवार, तलाठी योगेश ब्राम्हणे, तलाठी अविनाश जंजाळे, सुनिल मांडोळे, तलाठी हल्कारे यांच्या पथकाने केली असून डंपर वर तीन लाख रुपये व ट्रॅक्टर वर सव्वा लाख रुपये दंड आकारण्यात आला असून या पुढे तालुक्यातील गिरणा नदी पात्रात अवैध वाळू वाहतूकवर अशीच कारवाई सुरु राहणार असल्याची महिती देण्यात आली.