जळगाव ;– जिल्ह्यातील बैलांचा बाजार भरवणे व गुरांची वाहतूक करण्याबाबत असलेली बंदी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी उठवली आहे
ज्या जनावरांना लंपी प्रतिबंधक लसीकरण करून 28 दिवस पूर्ण असल्याच्या अटींवर गुरांच्या बाजाराला मान्यता देण्यात आले आहे लंपी संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावामुळे गुरांचा बाजार भरवण्यावर तसेच वाहतूक करण्याबाबत बंदी घालण्यात आली होती.