मुक्ताईनगर;-एका 25 वर्षीय तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून जबरदस्तीने मोबाईल ब्रेसलेट आणि पाच हजार दोनशे रुपये रोख लुटून तीन जणांनी पळ काढल्याची घटना हरातील बोदवड चौफुलीजवळील बादशहा ट्रॅव्हल्स ऑफिस जवळ 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,आकाश निवृत्ती माळी (वय 25) हे व्यवसायाने ड्रायव्हर असून पिंपरीअक्रौत ता. मुक्ताईनगर येथे राहतात. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी रवींद्र उर्फ माया महादेव तायडे आणि त्याच्या सोबत असलेले दोन अनोळखी इसम यांनी आकाश माळी यांच्या हातातील मोबाईल व ब्रेसलेट बळजबरीने घेऊन जात असताना आकाश माळी याने त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला असता आरोपी रवींद्र उर्फ माया याने कमरेला चाकू लावून त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करून खिशातील 5200 रुपये बळजबरीने काढून घेतले .याप्रकरणी आकाश माळी यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध 9 रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर भोई करीत आहे.