खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात ‘द बर्निंग रिक्षा’चा थरार

जळगाव : शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालत्या प्रवाशी रिक्षाने पेट घेतल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने धाव घेवून ही आग आटोक्यात आणली. तो पर्यंत रिक्षा जळून खाक झाली होती. आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही.

शहरातील पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुला जवळून गेलेल्या रस्त्यावर गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जळगावातून पिंप्राळा येथे जात असलेल्या (एमएच १९ व्ही ३४८८) क्रमांकाच्या रिक्षातून काही प्रवाशी घेवून चालक जात होते. त्यावेळी अचानक रिक्षाने पेट घेतला. ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा रोडच्या बाजूला घेवून रिक्षा थांबविली. त्यानंतर क्षणातच रिक्षाने मोठा पेट घेतला. यात होते.

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलावरील घटना

संपुर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली यांची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान काही वेळानंतर महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथकातील युसुफ पटेल, भारत बारी, रविंद्र बोरसे आणि तेजस जोशी यांनी बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्यात आली… याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरूहोते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button