जळगाव ,मालेगाव येथून मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक

जळगाव ,मालेगाव येथून मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक
जळगाव: शहर आणि मालेगाव येथून मोटारसायकली चोरणाऱ्या तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, हे आरोपी मालेगाव येथील एका हाफ मर्डर प्रकरणात फरार असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी विशेष मोहिमेचे निर्देश दिले होते. त्यानुसार, १६ मार्च रोजी एमआयडीसी पोलिसांनी गस्त घालत असताना तीन संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी मुबीन शाह शकील शाह (वय २०, रा. मालेगाव) , दानिश शाह जहीर शाह (वय २०, रा. मालेगाव) ,अमीर उर्फ अमिन शाह जहुन शाह (वय २२, रा. शाहू नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी जळगाव शहर, एमआयडीसी आणि मालेगाव येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. तसेच, हे तिघे मालेगाव येथील आझाद नगर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार होते. त्यांच्या अटकेमुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत घनके, रवींद्र चौधरी, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते, सिद्धेश डापकर आणि जॅकेश हटकर यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घनके, पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते करत आहेत.