जळगांवराजकीय

शिवसेनेचा ढाण्या वाघ पुन्हा जळगावात फोडणार डरकाळी!

खान्देश टाइम्स न्यूज | १९ ऑक्टोबर २०२३ | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी हे उद्या सकाळी ११ वाजता जळगाव शहरात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजातर्फे सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला ते भेट देणार असून त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत. गेल्या वेळी त्यांच्या दौऱ्यामध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. उद्या देखील ते आपल्या टीकेत अनेकांना लक्ष करण्याची शक्यता आहे.

कोळी समाजातर्फे जात प्रमाणपत्र आणि विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ६ उपोषणकर्त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत असून जळगावातील तिघे मंत्री, आजी माजी खासदार, आमदारांनी त्याठिकाणी भेट दिली आहे. उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी जळगावात येत आहेत. गेल्या वेळी त्यांनी विद्यमान पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी गुन्हा दाखल होऊन मोठा वाद देखील निर्माण झाला होता.

शरद कोळी उद्या दुपारी १२ वाजता कोळी समाजाच्या आंदोलनाला भेट देणार असून समाज बांधवांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. राज्य सरकार आणि जळगाव जिल्ह्यातील विद्यमान तिन्ही मंत्र्यांना ते आपल्या टीकेमध्ये लक्ष करण्याची शक्यता आहे. शरद कोळी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अगोदर खबरदारी घेण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button