खान्देशगुन्हेजळगांव

पाचोऱ्यात व्यापाऱ्याच्या घरातून १० लाखांची रोकड लंपास

पाचोरा : शहरातील व्यापारी हरी ओम मोर यांच्या घरात कपाटामध्ये ठेवलेली १० लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे.

शहरातील रंगारगल्ली येथे राहणारे व्यापारी हरिओम मोर यांचे राहत्या घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने १७ रोजी दुपारी चक्क १० लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर घरमालकाने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली होती. दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी घरमालक मोर यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button