जळगाव,;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 11 डिसेंबर रोजी ‘Developed India@2047: Voice of Youth’ या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील अनेक विद्यापीठाचे कुलगुरू, संस्थाप्रमुख व प्राध्यापकांना संबोधित केले. त्याचवेळी हा कार्यक्रम फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबसह विविध वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित करण्यात आले.
त्याचा जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्राध्यापकांनी हा कार्यक्रम संपूर्ण लाइव्ह पाहत पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यासहीत विविध विभागातील विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देशाला विकसित राष्ट्र बनवणे हे विकसित भारत योजनेचे उद्दिष्ट आहे..