खान्देशजळगांव

कॉंग्रेस आपल्या दारी उपक्रमाला पाचोऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा ;- “शासन आपल्या दारी” च्या जळगाव जिल्ह्य़ातील उपक्रमा नंतर पाचोरा कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नैतृत्वाखाली “कॉंग्रेस आपल्या दारी” या उपक्रमाला सुरवात करुन “कॉंग्रेस आरोग्याची वारी” ही मोहीम सुरू केली आहे. पाचोरा कॉंग्रेस ने तालुक्यातील सर्वच गावात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील घराघरात जाऊन जे रुग्ण आहेत त्यांची मोफत तपासणी करून त्यांच्या वर मोफत शस्त्रक्रिया देखील करत आहे.

या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन या आरोग्य वारी ची चर्चा परीसरात होत आहे. निंभोरी तांडा येथे पहिले शिबीर सचिनदादा सोमवंशी युवा फाउंडेशन व निंभोरी कॉंग्रेस कमिटी आणि जय सेवालाल मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले. यावेळी गोदावरी हॉस्पिटल ची सर्व विभागातील आरोग्य टिम उपस्थितीत होती. यात ह्दय विकारा सबंधित रुग्णांनाची ई. सी. जी‌. सह २ डी इको मोफत काढण्यात आले. यावेळी परीसरातील ३५० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

शिबीरात डॉ. सचिन संघपावद, डॉ. साइकत बासु, डॉ. अनिकेत, डॉ. नरवाडे, डॉ. समराधाश्री पाथरे, कनिष्का कौशल आदींनी तपासणी केली. यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी प्रविण राठोड, नारायण राठोड, कृष्णा पवार, प्रदीप पाटील, राहुल पवार, अरविंद राठोड, किशोर राठोड, किरण राठोड, विठ्ठल राठोड, अशोक राठोड, सतिश राठोड, अनिल राठोड, किसन राठोड, कृष्णराव जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button