भुसावळ :- शहरातील एका परिसरात राहणार्या 25 वर्षीय महिलेवर वर्षभर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात 25 वर्षीय पीडीता वास्तव्यास आहे. पीडीतेची आई जळगाव येथे दवाखान्यात उपचार घेत असताना आरोपीने घर खर्चासाठी तसेच मुलांना कपडे घेण्यासाठी तसेच चांगल्या शाळेत शिकण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. हा प्रकार सप्टेंबर 2023 ते 27 जानेवारी 2024 दरम्यान घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीतेने बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी करीत आहेत.