इतर

निलेश तायडे यांचा भाजपात प्रवेश

जळगाव ;- भाजप हा सर्व सामान्यांचा पक्ष भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून सबका साथ सब का विकास या मुलमंत्रावर चालताना वाल्मीक नगर जळगांव येथील सुप्रसिध्द समाजसेवक निलेश विश्वनाथ तायडे ( नीलू आबा ) यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्राचे ग्रामीण विकास, पंचायत राज, पर्यटन व वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य .गिरीश महाजन , बजाप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, यांच्या उपस्थितीत नीलू आबा यांचा भाजप मध्ये प्रवेश करण्यात आला.

यावेळेस पक्षांचे जळगाव चे खासदार उन्मेष पाटील , रावेर चे खासदार रक्षा ताई खडसे, जळगाव येथील आ. राजू मामा भोळे, चाळीसगाव आ. मंगेश चव्हाण, भुसावळ आ. संजय सावकारे, आ. सुभाष भामरे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहूल लोणीकर डॉ. केतकी पाटिल,जळगाव ग्रामीण अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर ,जळगाव शहर अध्यक्ष उज्वला ताई बेंडाळे , माजी उपमहापौर सुनील भाऊ खडके, रेमंड प्रशासन अधिकारी सुनिल भाउ पाटिल व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करण्यात आला यावेळी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button