वर्धा;- राज्यस्तर सेपक टकारा स्पर्धा येथे दिनांक ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान झाली . सदर स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा १९ वयोगट जूनियर संघाने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावून विजय खेचून आणला.
सदर स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे संघाने गोंदिया ,धुळे, सोलापूर ,नांदेड , ठाणे, संघांना पराभूत करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले सदर स्पर्धेत कर्णधार अबुजर बागवान , तनवीर शाह, सय्यद सेकेब,फैजान शेख ,मोहम्मद उमर, फुरकान खान, मोहम्मद हम्माद ,अदनान तांबोळी मिर्झा हस्सान ,रोहन खान,सय्यद आवेश,शेख रिहान या खेळाडूनी उत्कृष्ट खेळ करीत विजयश्री खेचून आणली.
संघ मार्गदर्शक म्हणून आसिफ मिर्झा व फैजान शेख तर संघ व्यवस्थापक म्हणून आमिर खान होते विजयी संघाचे महाराष्ट्र राज्य सेपक टकारा संघटनेचे अध्यक्ष विपिन कामदार ,सचिव योगेंद्र पांडे , वर्धा येथील यशवंतराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र बेले, राहुल भालेकर, सौ. पांडे, सौ. कामदार, डॉ.विनय मून,अमृता पांडे, जळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एजाज मलिक प्रा. चंद्रकांत सोनवणे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, सचिव डॉ.प्रदीप तळवलकर उपाध्यक्ष प्रा. इक्बाल मिर्झा, दत्तू सर सोलापूर, रवी बकवाड सर नांदेड प्राध्यापक यशवंतराव महाविद्यालय, प्रशांत जगताप ,राजेश जाधव, प्रवीण पाटील ,मुख्याध्यापक डॉ.बाबू शेख, वसीम मिर्झा, शेहबाज शेख,आसिफ मिर्झा ,मुजफ्फर शेख आदींनी अभिनंदन केले.