जम्मू: ;- जम्मू-काश्मीरमधील दुर्गम पूंछ भागात क्षेत्रीय वर्चस्व गस्तीदरम्यान नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या पुरात भारतीय लष्करातील नायब सुभेदार कुलदीप सिंग वाहून गेले. जम्मूमधील संरक्षण विभागाच्या पीआरओने दिलेल्या माहितीनुसार, पुंछमधील पोशाना नदीत दोन लष्करी जवान वाहून गेले आहेत. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात रविवारी त्यांचे मृतदेह सापडले
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सैनिक सुरनकोट भागातील पोशाना येथील डोग्रा नाला ओलांडत असताना मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ते वाहून गेले. जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कर, पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप दोन्ही जवानांचा शोध लागलेला नाही. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतर पूरस्थिती असलेल्या सर्व नद्या-नाल्यांपासून पोलिसांनी जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांना दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.