खान्देशगुन्हेजळगांवदेश-विदेशराजकीयशासकीयसामाजिक

१९ एप्रिल ते १ जूनदरम्यान ७ टप्प्यांत मतदान ४ जून रोजी निकाल ; महाराष्ट्रात ५ टप्यांत मतदान

देशभरात आदर्श आचारसंहिता लागू

नवी दिल्ली ;– निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत लोकसभेच्या ५४३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. देशभरात मतदानाचे एकूण सात टप्पे असतील. एप्रिल महिन्यात १९ आणि २६ तारखेला मतदानाचे दोन टप्पे पार पडतील. या दोन्ही तारखांना अनुक्रमे १०२ आणि ८९ जागांसाठी मतदान होईल. मे महिन्यात चार टप्पे आहेत. त्यानुसार ७ मे रोजी तिसरा टप्पा (९४ जागा), १३ मे रोजी चौथा टप्पा (९६ जागा), २० मे रोजी पाचवा टप्पा (४९ जागा) आणि २६ मे रोजी सहाव्या टप्प्या (५७ जागा) चे मतदान पार पडेल. १ जून रोजी अखेरच्या सातव्या टप्प्यात उर्वरित ५७ जागांसाठी मतदान होईल. उत्तर प्रदेश (८० जागा), पश्चिम बंगाल (४२ जागा), बिहार (४० जागा) या तीन राज्यांमध्ये सातही टप्प्यांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.

राज्यात लोकसभेसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक पार पडेल. लोकसभा, चार राज्यांच्या विधानसभा आणि २६ विधानसभा मतदारसंघातीलपोटनिवडणुकीसाठी ४ जून रोजी एकाच दिवशी मतमोजणी होईल. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात देखील विधानसभा निवडणूक अपेक्षित होती; परंतु या निवडणुकीबाबत आयोगाने कोणतीही घोषणा के लेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत.या निवडणुकीसाठी ९६ कोटी ८० लाख मतदार पात्र आहेत. यामध्ये ४९.७० कोटी पुरुष, तर ४७.१० कोटी महिला मतदार आहेत. नवमतदारांची संख्या १ कोटी ८० लाख असून, ते प्रथमच मतदान करतील. १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. निवडणूक आयोगाने ८५ वर्षे वयापुढील आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. देशात ८५ वर्षांपुढील ८२ लाख, तर वयाची शंभरी ओलांडलेल्या मतदारांची संख्या २ लाख १८ हजार इतकी आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ४० हजार निमलष्करी दलाच्या जवानांसह राज्य सरकारच्या पोलीस दलाचे कर्मचारी तैनात असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button