एरंडोल:-तालुक्यातील रिंगणगाव येथे १५ मार्च रोजी रात्री किरकोळ कारणावरून चंद्रकांत पुंडलिक बोबडे वय 48 वर्ष या इसमास किरकोळ कारणावरून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
तेजस गोरख पाटील ,शुभम गोरख पाटील ,अर्जुन तुकाराम पाटील यांनी 15 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चंद्रकांत पुंडलिक बोबडे हा अंगणात उभा असताना . तू माझ्याकडे रागाने का बघतोस असे तेजस पाटील याने बोलून चंद्रकांत बोबडे यास मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा त्याचा भाऊ शुभम गोरख पाटील हा सुद्धा तेथे येऊन त्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.
त्यावेळी अर्जुन पाटील याने त्याच्या हातातील लाकडी काठीने बोबडे यांच्या डोक्यावर लाकडी काठी मारून दुखापत केली. यावेळी बोबडे चा भाऊ हेमचंद्र बोबडे, धनराज तुकाराम पाटील राजू पंढरीनाथ पाटील यांनी सोडवा सोडव केली याप्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे करीत आहे