खान्देश

धक्कादायक : रमजानचे पूर्ण रोजे ठेवणारा तरुण ईदच्या दिवशी बुडाला

खान्देश टाइम्स न्यूज | मुख्तार शेख | रावेर तालुक्यातील सावदा येथील १६ वर्षीय तरुणाने महिनाभर रमजान महिन्याचे रोजे ठेवले होते. ईदची नमाज पठण केल्यानंतर गारबर्डी धरण पाल येथे मित्रांसोबत फिरायला गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ईदच्या दिवशी घडलेल्या घटनेने सावदा परिसरावर शोककळा पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि.११ एप्रिल रोजी ईदची नमाज आटोपल्यानंतर शेख ताबीज शेख रमजान मोमीन वय १५ ते १६ रा.ख्वाजा नगर, सावदा हा मुलगा आपल्या मित्रांसोबत गारबर्डी धरण पाल येथे गेला होता. धरणात पाय घसरून त्याचा मृत्यू झाला. गावातील काही लोकांना फोन आला कि, सावदा येथील एक युवक गारबर्डी धरण पाल येथे बुडाला आहे. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच माजी नगरसेवक फिरोज खान व गावातील तरुणांनी सावदा पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. माहिती मिळताच रावेर ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने तरूण पोहोचले होते. माहितीनुसार शेख ताबीज शेख रमजान मोमीन याने पवित्र रमजानचे पुर्ण उपवास ठेवले होते व अहते काबमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. ताबीज शेख याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button