भडगाव शहरातील नगरदेवळा दरवाजाची उंची वाढवावी आझाद मिञ मंडळातर्फे मुख्याधिकाऱ्याना निवेदन
जळगाव l भडगाव प्रतिनिधी l शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केले जातात. गणेश उत्सव काळात आझाद चौकातील आझाद मिञ मंडळ श्रींची मूर्ती जुन्या गावात नेण्यास अडचण निर्माण होते.तरी लवकरच
नगरदेवळा दरवाजाची उंची वाढवावी असे लेखी निवेदन
मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमात नगरदेवळा दरवजाच्या उंची मुळे अडचणी निर्माण होत असतात. तसेच दरवर्षी आझाद मित्र मंडळ, भडगाव गणेशोत्सव आगमन सोहळा. जल्लोषात साजरा केला जातो तरी आगमन सोहळ्या, दरम्यान नगरदेवळा दरवाजाच्या उंची मुळे श्रींची मूर्ती जुन्या गावात आणण्यास अडचण निर्माण होते. काहीवेळेस सदर दरवाजा मुळे मूर्तीची विटंबना होण्याची दाट शक्यता जाणवते. सदर दरवाजा जीर्ण असून जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. सदर दरवाजाची उंची वाढविण्यात यावी असे निवेदन भडगाव नगरपरिषदेचे मुख्यधीकारी रविंद्र लांडे यांना दिले यावेळी आझाद मिञ मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.