जळगाव I प्रतिनिधी I :- जळगावतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी हा राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलिसांनी त्याला आज 13 रोजी अटक केली आहे. सूत्राने दिलेली माहिती अशी की, शहरातील शंकरराव नगर राहणारा हद्दपार आरोपी निशांत प्रताप चौधरी वय 20 हा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असताना तो त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबले यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल गिरीश पाटील व पोलीस शिपाई विकी इंगळे हे रात्री ग्रस्त घालित असताना तेरा रोजी निशांत चौधरी हा मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राहत्या घरी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळ यांच्या आदेशानुसार आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास त्याच्या घरात तपासणी केली असता निशांत चौधरी हा मिळून आला. त्याला पोलीस अधीक्षक यांनी दोन वर्षांसाठी हद्दपर केले होते
निशांत चौधरी याच्या विरुद्ध विकी इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 चे कलम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेका विजय खैरे करीत आहेत.