इतर

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 95 अर्ज प्राप्त

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 95 अर्ज प्राप्त

जळगाव, जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम आज दिनांक 2 जून रोजी सकाळी 10.30 वाजता अल्पबचत भवन, जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात एकूण 95 अर्ज प्राप्त झाले.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, तहसीलदार (संजय गांधी योजनांतर्गत)डॉ.उमा ढेकळे,
नायब तहसीलदार राहुल सोनवणे (करमणूक शाखा), इतर शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन कार्यवाहीच्या सूचना दिल्या गेल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button