इतर

पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांची येवला शहर पोलीस ठाण्यात बदली

पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांची येवला शहर पोलीस ठाण्यात बदली

नाशिक : महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१, तसेच महाराष्ट्र पोलीस सुधारणा व पुढे चालू ठेवणे अधिनियम २०१४ व सुधारणा अध्यादेश २०१५ अंतर्गत जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या अधिकारानुसार, जनहित व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक ग्रामीण पोलीस विभागात नव्याने हजर असलेल्या पोलीस निरीक्षक अनिल विठ्ठल भवारी यांची येवला शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

सदर नेमणूक प्रशासनिक कारणास्तव तातडीने केली गेली असून, भवारी यांनी नव्या ठिकाणी तत्काळ हजर राहून आपला अनुपालन अहवाल नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करावा, असे आदेश पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button