इतर

प्रसूती रजेसाठी ३६ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिका आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात

प्रसूती रजेसाठी ३६ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिका आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात

सावदा (प्रतिनिधी : मुख्तार शेख)
खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयात महिला उपशिक्षिकेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (५७, रा. चिनावल रोड, खिरोदा) आणि कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (२७, रा. उदळी, ता. रावेर) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सोमवार, ७ जुलै रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील तक्रारदार ६१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, त्यांच्या स्नुषा या धनाजी नाना विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २ जून रोजी प्रसूती रजेचा अर्ज सादर केला होता. त्यानंतर तक्रारदाराने सुनेच्या सांगण्यावरून मुख्याध्यापिकेची भेट घेतली असता, सहा महिन्यांच्या रजेच्या मंजुरीसाठी प्रती महिना पाच हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. आरोपींनी ६ महिन्यांसाठी एकूण ३६ हजार रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले. ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताना कनिष्ठ लिपिकाला आणि त्यानंतर मुख्याध्यापिकेलाही धुळे एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.

ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button