
जळगाव: ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत समाजवादी पार्टी, जळगाव आणि नेत्र ज्योती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पिंप्राळा, हुडको येथे मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर सुरू होते, ज्यात २३० गरजू रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८ जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तर ६५ रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हॉस्पिटलतर्फे चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.
यावेळी समाजवादी पार्टीचे महानगर अध्यक्ष रिझवान जहांगीरदार, अल्पसंख्याक प्रदेश सचिव रईस कुरेशी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष हुसैन बाबा साबरी, महिला महानगर अध्यक्ष फिरोज शेख, संगीता मोरे, शबाना शेख, आबेदा बेग, अल्पसंख्याक महानगर उपाध्यक्ष तौसीफ खान, वाहतूक आघाडी अध्यक्ष असलम पठाण आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





