खान्देशजळगांवशासकीयसामाजिक

सप्तचक्र मानवी शरीरात असीम ऊर्जेचा स्त्रोत – प्रा. कृणाल महाजन

महाराष्ट्र योगशिक्षक संघाचा वर्धापन दिन 'सप्तचक्र ध्यान' करून ऊर्जात्मक साजरा

सप्तचक्र मानवी शरीरात असीम ऊर्जेचा स्त्रोत – प्रा. कृणाल महाजन

महाराष्ट्र योगशिक्षक संघाचा वर्धापन दिन ‘सप्तचक्र ध्यान’ करून ऊर्जात्मक साजरा

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र योगशिक्षक संघाचा तृतीय वर्धापन दिवस सप्तचक्र ध्यान करून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथील प्रा.कृणाल महाजन, महाराष्ट्र योगशिक्षक संघ जळगाव जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन आणि महासचिव पांडुरंग सोनार आदि मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम विश्वमंगल योग निसर्गोपचार केंद्र याठिकाणी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रतिमा व महामुनी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर पांडुरंग सोनार यांनी संघाच्या कार्याची माहिती आणि बारा सूत्री मागणी पत्राचे वचन केले. दरवर्षी गुढीपडावा हा महाराष्ट्र योगशिक्षक संघाचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तीन वर्षांपूर्वी डॉ.मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनात राज्यातील प्रमुख योगशिक्षकांनी एकत्र येऊन योगशिक्षकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी संघाची स्थापना केली. आज रोजी संपर्ण राज्यात संघाचे ७००० च्या वर सदस्य आहेत.

जळगाव जिल्ह्यातील योगशिक्षकांना समाजाच्या आरोग्यासाठी अथक परिश्रम घेण्याविषयी प्रोत्यासाहित करून मानवी शरीरातील ऊर्जेचा असीम स्त्रोत असलेले सप्तचक्रांचे ध्यान प्रा.कृणाल महाजन यांनी घेतले. कार्यक्रमात प्रास्ताविक प्रा.चित्रा महाजन यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उपाध्यक्षा डॉ.शरयू विसपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता रोहन चौधरी, नूतन जोशी, कविता चौधरी, नेहा तळेले, जयश्री रोटे, सोनाली पाटील, पल्लवी उपासनी, वैशाली भारंबे आदि योगसाधकांचे सहकार्य लाभले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button