खान्देशजळगांवदेश-विदेशराजकीयशासकीयसामाजिक

जळगाव-मुंबई विमानसेवा आता दररोज; अवघ्या दीड तासात गाठा मुंबई!

जळगाव-मुंबई विमानसेवा आता दररोज; अवघ्या दीड तासात गाठा मुंबई!

बंद असलेली अहमदाबाद सेवाही सुरू; हिवाळी वेळापत्रक जाहीर

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हवाई प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, , २६ ऑक्टोबर २०२५ पासून जळगाव ते मुंबई दरम्यानची विमानसेवा आता दररोज (Daily) सुरू झाली आहे. यामुळे आता जळगावहून अवघ्या दीड तासात मुंबई गाठणे शक्य होणार आहे, ज्यामुळे वेळ आणि श्रमाची मोठी बचत होणार आहे.

अलायन्स एअरचा महत्त्वपूर्ण निर्णय

अलायन्स एअरकडून जळगाव-मुंबई विमानसेवा यापूर्वी आठवड्यातून केवळ चार दिवस पुरवली जात होती. परंतु, या सेवेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कंपनीने ही सेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २६ ऑक्टोबर २०२५ ते २८ मार्च २०२६ पर्यंतचे नवे हिवाळी वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे, जे रविवारपासून (दि. २६) लागू झाले आहे.

अहमदाबाद सेवा पुन्हा पूर्ववत

जळगावकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी म्हणजे, गेले दोन महिने तात्पुरती बंद असलेली जळगाव-अहमदाबाद विमानसेवा देखील पुन्हा सुरू केली जात आहे. मुंबईसोबतच अहमदाबादसाठी सेवा पूर्ववत झाल्याने व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि नोकरदार यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

जळगाव विमानतळावरून सध्या केंद्र सरकारच्या ‘उडान’ (UDAN) योजनेच्या अंतर्गत गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या पाच प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. या सेवांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जात आहे. दैनंदिन मुंबई सेवा सुरू झाल्यामुळे जिल्ह्याची वाहतूक क्षमता वाढेल, ज्यामुळे पर्यटन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे.

नवे हिवाळी वेळापत्रक

गोवा-जळगाव:
सोम–रवि (शनिवार वगळून): १२.१० निघून १३.५० ला पोहोचेल.
शनिवारी : १४.३० ला निघून १६.२० ला जळगावात.

जळगाव-गोवा:
सोम, मंगळ, गुरु, शुक्र, रवि – १७.३५ ला निघून १९.२० ला पोहोचेल.
बुधवार – १८.०५ ला निघून २०.०५ ला पोहोचेल.
शनिवार – २०.२५ ला निघून २२.२५ ला पोहोचेल.

जळगाव–पुणे:
सोम–रवि (शनिवार वगळून): १४.१० निघून १५.३० ला पोहोचेल.
शनिवार – १६.४० ला निघून १८.०० ला पोहोचेल.

पुणे–जळगाव:
सोम–रवि (शनिवार वगळून): १५.५० निघून १७.१५ ला पोहोचेल.
शनिवार – १९.०० निघून २०.०५ ला पोहोचेल.

जळगाव–हैदराबाद:
दररोज – १८.२५ निघून २०.४५ ला पोहोचेल.
हैदराबाद–जळगाव: दररोज – १६.२५ निघून १८.०५ ला पोहोचेल.

मुंबई–जळगाव–मुंबई:
मंगळ, गुरु, शनि – रात्री ८.०० ला मुंबईहून येऊन ८.३५ ला परतीचे उड्डाण.
सोम, बुध, शुक्र, रवि – दुपारी ४.२० ला मुंबईहून जळगावला, ४.४५ ला अहमदाबादसाठी रवाना. रात्री ८.०० ला परत येऊन ८.२५ ला मुंबईला परत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button