‘गझल अमृत’ दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
जळगाव l २४ ऑगस्ट २०२३ l गझल मंथन साहित्य संस्था ‘गझल अमृत’ दिवाळी विशेषांक घेऊन येत आहे. यंदाचा विशेषांक १२० पानांचा असणार आहे. या दिवाळी विशेषांकात ज्येष्ठ गझलकारांचे गझलेविषयी मार्गदर्शनपर लेख आणि सदाबहार गझला असणार आहेत. तरी इच्छुकांनी आपल्या उत्तमोत्तम दोन निर्दोष गझला टाईप करून ३१ ऑगस्टपर्यंत पाठवायच्या आहेत. गझल टाईप केलेले फोटो, पीडीएफ स्वरूपातील गझल पाठवू नये. दोन गझलांपैकी एक गझल दिवाळी विशेषांकासाठी स्विकारण्यात येईल.
गझल प्रकाशित करण्याचा वा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार संस्थेला व साहित्य निवड समितीला आहे. या दिवाळी अंकात प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याबद्दल साहित्यिकांना कोणत्याही प्रकारचे मानधन मिळणार नाही. संस्था गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी हा विशेषांक “ना नफा ना तोटा” या तत्वावर प्रकाशित करणार आहे. दिवाळी अंकाची कार्यकारी संपादक पदांची जबाबदारी डॉ. कैलास गायकवाड, शांताराम खामकर (शाम) आणि समीर बापट हे सांभाळणार आहेत. व्यवस्थापकीय संपादक म्हणून निलेश कवडे काम पाहतील.
दिवाळी अंकासाठी पुरुष गझलकारांनी आपल्या गझला संजय तिडके (९४०३५०४९४०) आणि ॲड. मुकुंदराव जाधव (८८०६५४४४७२) तर महिला गझलकारांनी आपल्या गझला अनिता खैरनार (९८२२८५६०८३) आणि यशश्री रहाळकर (९०२८५५८८३१) यांच्या व्हाट्सअप नंबर वर पाठवाव्यात. असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, सचिव जयवंत वानखडे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सहसचिव उमा पाटील, खान्देश उप-विभाग प्रमुख ॲड. मुकुंदराव जाधव, प्रसिद्धी प्रमुख भरत माळी यांनी केले आहे.