खान्देशगुन्हेजळगांव

राष्ट्रीय एकता परेडसाठी जळगावचे पो.कॉ. सागर सोनार यांची निवड

राष्ट्रीय एकता परेडसाठी जळगावचे पो.कॉ. सागर सोनार यांची निवड

जळगाव प्रतिनिधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2025 रोजी गुजरातमधील केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिवस परेडसाठी देशभरातील निमलष्करी दल आणि विविध राज्यांच्या पोलीस दलांचा सहभाग असणार आहे. या भव्य परेडचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

या परेडसाठी महाराष्ट्र पोलीस वाद्यवृंद पथकात जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालयात कार्यरत कॉन्स्टेबल श्री. सागर अशोक सोनार यांची विशेष निवड झाली आहे. ते महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करीत परेडमध्ये सहभागी होतील.

2014 बॅचचे पोलीस कॉन्स्टेबल असलेले सागर सोनार यांनी यापूर्वी अनेक राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रतिनिधित्व केले असून, जळगाव पोलीस संघासाठी पदकेही मिळवली आहेत.

या निवडीसाठी श्री. सोनार यांना जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. आव्हाड, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. सचिन चिवंडे तसेच जळगाव जिल्हा वाद्यवृंद पथक प्रमुख सलीम खान यांचे मार्गदर्शन मिळाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button