इतर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात

देवाभाऊ फाऊंडेशन व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचा उपक्रम

जळगाव  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवाभाऊ फाऊंडेशन व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन, जळगाव जिल्हा यांच्या वतीने माल्यार्पण व अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सिव्हिल हॉस्पिटलसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि बहुजन-वंचितांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व न्याय यांचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण
जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल वाघ यांच्या हस्ते पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन देवाभाऊ फाऊंडेशनचे लोकसभा सहसमन्वयक प्रल्हाद सोनवणे, प्रमोद वाणी तसेच कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार यांनी केले.

संविधान वाचनाने अभिवादन
कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाचे वाचन करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या वेळी पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजुभाई मोरे, डॉ. अवधूत चौधरी, माधवराव कुळकर्णी, सुरेश सोनवणे, सुरेश वाघ, प्रमोद वाणी, सुरसिंग पाटील, सुनील जाधव, माजी उपमहापौर मिलिंद सपकाळे, डॉ. शंकरलाल सोनवणे, विकास पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोठ्या संख्येने उपस्थिती

या कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समता, बंधुता व न्याय यांचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button