इतर

कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सुन्नी मुस्लिम बांधवांचे आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सुन्नी मुस्लिम बांधवांचे आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद तसेच त्यांच्या पत्नींबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकात सुन्नी मुस्लिम बांधवांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

प्रदर्शनादरम्यान उपस्थितांनी सांगितले की, इस्लाम धर्मात प्रेषित हजरत मोहम्मद यांना सर्वोच्च मान व आदराचे स्थान असून त्यांच्या संदर्भातील कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. तसेच संबंधित व्यक्तीच्या छायाचित्राचा निषेधात्मक स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या प्रसंगी सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली, सीनिम अयाज अली सय्यद, नूरजहाँ कुरेशी, सईदा बी जावेद, अफरोज बी रऊफ, शेख नजीरुद्दीन, शेख अरशद, काशिफ अब्दुल कलाम, शेख आसिफ, खलील खान, इलियास नुरी, गुलाम अहमद, शफी ठेकेदार, नूर मोहम्मद, वसीम हुसैन यांच्यासह समाजातील अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button