इतर

टपरीवाल्यापासून महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘पाणीवाले बाबा’ गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

टपरीवाल्यापासून महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘पाणीवाले बाबा’ गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

खानदेश टाइम्स Iजकी अहमद

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या अस्सल ग्रामीण शैलीतील झंझावाती भाषणांनी, तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेल्या घट्ट नात्याने आणि जनसामान्यांच्या सुख-दुःखात कायम सहभागी होण्याच्या स्वभावामुळे वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव रघुनाथ पाटील. आज, ५ जून रोजी त्यांचा वाढदिवस. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणाने टपरी चालवत सुरू केलेला प्रवास आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचला आहे. संघर्ष, जिद्द आणि जनसेवेच्या बळावर उभा राहिलेला हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

साध्या शेतकरी कुटुंबातून घडलेले नेतृत्व

५ जून १९६६ रोजी धरणगाव तालुक्यातील पाळधी (बु.) येथे गुलाबराव पाटील यांचा जन्म झाला. वडील रघुनाथ चत्रू पाटील यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे संस्कार दिले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण करून त्यांनी जळगाव येथे उच्च शिक्षण घेतले. तरुण वयापासूनच सामाजिक कार्याची आवड आणि लोकांशी असलेला जवळचा संवाद यामुळे ते परिसरात लोकप्रिय झाले.

शाखाप्रमुख ते कॅबिनेट मंत्री

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी पाळधी येथे शिवसेना शाखेची स्थापना करून शाखाप्रमुख म्हणून राजकीय वाटचालीला सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. १९९१ मध्ये चाळीसगाव येथे केलेल्या ओजस्वी भाषणाने ते राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले.

त्यानंतरचा त्यांचा राजकीय प्रवास सातत्याने उंचावत गेला.

– १९९२ : पंचायत समिती सदस्य व बाजार समिती संचालक
– १९९७ : जिल्हा परिषद सदस्य व कृषी समिती सभापती
– १९९९ : प्रथमच एरंडोल विधानसभा मतदारसंघातून आमदार
– २००४ : पुन्हा आमदार
– २०१४ : जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विजय
– २०१९ आणि २०२४ : सलग विजयी घोडदौड
– २०१६ : सहकार राज्यमंत्री
– २०१९ पासून : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री
– जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रभावी नेतृत्व

पाणीवाले बाबा’ म्हणून राज्यभर ओळख

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या ध्यासामुळे गुलाबराव पाटील यांना जनतेने प्रेमाने ‘पाणीवाले बाबा’ ही उपाधी दिली.

जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील हजारो गावांमध्ये नळजोडण्या पोहोचविण्यात त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. जळगाव जिल्ह्यातच सुमारे १३५४ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असून अनेक योजना पूर्णत्वास गेल्या आहेत.

ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचा त्यांचा संकल्प आजही कायम आहे. राज्यभर सातत्याने दौरे, आढावा बैठका आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे ते योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतात.

विकासकामांचा वेगवान ध्यास

पाणीपुरवठ्याबरोबरच ग्रामीण विकास, स्वच्छता, नाला खोलीकरण, जलसंवर्धन, रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. जळगाव जिल्ह्यासाठी शेकडो कोटी रुपयांच्या विकासकामांना गती मिळाली. ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले.

मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख

गुलाबराव पाटील हे केवळ मंत्री नाहीत, तर खानदेशातील शिवसेनेची एक प्रभावी आणि लढाऊ ताकद मानली जाते. अस्सल अहिराणी बोली, ग्रामीण मराठीवरील प्रभुत्व, विनोदी शैली आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची हातोटी यामुळे ते जनतेच्या मनात घर करून आहेत.

साधे राहणीमान, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि २४ तास सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणारे नेतृत्व ही त्यांची खरी ओळख आहे. म्हणूनच आजही गावातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी आणि युवक त्यांना आपल्या घरातील माणूस मानतात.

जनतेच्या विश्वासाचा आधारवड

संघर्षातून घडलेले नेतृत्व, विकासासाठी झटणारा मंत्री आणि जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर असणारा लोकनेता म्हणून गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव केवळ जळगावपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो.

वाढदिवसाच्या अनंतशुभेच्छा!

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा संकल्प घेऊन काम करणारे, जनतेच्या विश्वासाचे नेतृत्व आणि विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असलेले आदरणीय ना. गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राची प्रगती अशीच वेगाने होत राहो, हीच सदिच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button