खान्देशजळगांव

आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांनी कारवाई करत आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. २८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील कुटीर रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक विजय प्रकाश वाघ (वय ४२) यांनी एका तक्रारदाराकडून नोकरीसंदर्भातील स्थायी आदेश मिळवून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपीने २ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पारोळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपासादरम्यान आरोपीकडून रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

पथकाची कारवाई

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, सुरेश पाटील, सुनील वानखेडे, बाळू मराठे आदींच्या पथकाने यशस्वी केली.
या घटनेमुळे भ्रष्टाचाराविरोधात एसीबीच्या कारवाईचा धाक अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button