खान्देशजळगांवसामाजिक

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

‘जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

जळगाव दि.२१ प्रतिनिधी – बाल रंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा व कान्हा ललित कला केंद्र, जळगाव आयोजित “जल्लोष लोककलेचा” या कार्यक्रमात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल यांनी विविध कलाप्रकारात उत्कृष्ट कामिगीरी करीत घवघवीत यश संपादन केले. या यशातून अनुभूती स्कूलच्या संघ, तसेच एकल प्रकारात दोन विद्यार्थी लातूरला होऊ घातलेल्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. समूह लोकनृत्य प्रथम एकल लोकवादन प्रथम यशोदीप थोरात, एकल लोकगीत प्रथम आराध्य खैरनार यांचीसुद्धा निवड झाली आहे. ह्यांच्यासोबत अनुभूतीच्या तनुश्री दांडगे हिने एकल लोकनृत्य कलाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन व शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांनी विशेष कौतूक केले आहे. या यशासाठी शाळेचे नृत्यशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व संगीत शिक्षक भूषण खैरनार यांच्या सह सर्व शिक्षकवृदांनी विशेष परिश्रम घेतले.

जल्लोष लोककलेच्या या स्पर्धेत समूह लोकनृत्यासाठी २३ संघ, एकल लोकगीतासाठी ८ स्पर्धक, एकल लोकवादनासाठी ८ स्पर्धक, समूह लोकगीतासाठी ६ संघ तर एकल लोकनृत्यासाठी २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अनुभूती स्कूलने दैदिप्यमान यश संपादन केले. समूह लोकनृत्य, एकल लोकवादन आणि एकल लोकगीतमध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक, समूह लोकगीत आणि एकल लोकनृत्यात उत्कृष्ट द्वितीय पारितोषिके प्राप्त केली आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दिपमाला काळे, डॉ. केतकी पाटील, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी, उद्योजक रजनिकांत कोठारी उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण समारंभासाठी पीपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, एम. जे. कॉलेजचे संचालक शशिकांत वडोदकर, बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, उपाध्यक्ष नेहा पवार-गुजंराठी उपस्थित होते.

*पारितोषिकाचे स्वरूप* :

१. समूह लोकनृत्य (प्रथम) – रोख ३०००/- रुपये, चषक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

२. एकल लोकवादन (प्रथम) – रोख १०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

३. एकल लोकगीत (प्रथम) – रोख १०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

४. समूह लोकगीत (द्वितीय) – रोख २०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

५. एकल लोकनृत्य (द्वितीय) – रोख ७००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button