खान्देशजळगांवशिक्षणसामाजिक

आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत ‘इकरा थीम’ कॉलेजचे यश; जळगाव विभागात अजिंक्यपद पटकावले!

आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत ‘इकरा थीम’ कॉलेजचे यश; जळगाव विभागात अजिंक्यपद पटकावले!

​जळगाव: प्रतिनिधी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरून, जळगाव संघाने शानदार विजय मिळवत विजेतेपद आपल्या नावावर केले. मु. जे. महाविद्यालय, जळगावच्या मैदानावर या रोमांचक स्पर्धा पार पडल्या.
​दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखदार आयोजन
​स्पर्धेचे अध्यक्षस्थान इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी भूषवले. याप्रसंगी सचिव एजाज मलिक, मजीद सेट जकरिया, डॉ. संजय चौधरी, डॉ. अनिता कोल्हे, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. उमेश पाटील, डॉ. वानखेडे, प्राचार्य डॉ. वकार शेख, डॉ. तनवीर खान, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. अमिन काझी, श्री. अशफाक पठाण आणि फरहान शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
​कार्यक्रमाची प्रास्ताविका व सूत्रसंचालन प्रा. डॉ. चांद खान यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ. वकार शेख यांनी मानले. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या हस्ते टॉस करून सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले.
​रोमहर्षक सामने आणि अंतिम फेरीचा थरार
​पहिला सामना: इकरा विरुद्ध रावेर महाविद्यालय यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये इकरा संघाने ०२ गोल करीत विजय मिळवला.
​दुसरा सामना: नूतन मराठा आणि एम. जे. कॉलेज, जळगाव यांच्यात रंगलेल्या सामन्यात नूतन मराठा संघाने ०२ गोल ने बाजी मारली.
​अंतिम सामना: इकरा महाविद्यालय विरुद्ध नूतन मराठा यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात इकरा महाविद्यालयाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत २ गोल ने सामना जिंकला आणि विजयश्री खेचून आणली.
​मुलींच्या गटातही चुरशीचे सामने
​मुलींच्या स्पर्धेतही खेळाडूंनी उत्तम कौशल्य दाखवले:
​पहिल्या सामन्यात पीजीयूजी (PGUG) महाविद्यालय संघाने रावेर महाविद्यायविरुद्ध ०२ गोल ने विजय मिळवला.
​दुसऱ्या सामन्यात एम. जे. कॉलेज विरुद्ध बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्यात सामना होऊन बेंडाळे महाविद्यालय विजयी ठरले.
​मुलींच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात युजीपीजी (UGPG) संघाने विजय मिळवला.

​पंच आणि आयोजन समितीचे परिश्रम
​प्रा. डॉ. आसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आरिफ कुरेशी, अकबर खान, इम्रान बिस्मिल्ला आणि शाहबाझ यांनी पंच म्हणून निष्पक्ष भूमिका पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मु. जे. महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच इकराचे सय्यद वसीम अली, रफीक शेख व इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button