खान्देशगुन्हेजळगांव

पाळधी येथील वाईन शॉपमध्ये चोरी; ४२ हजारांची रोकड लंपास

पाळधी येथील वाईन शॉपमध्ये चोरी; ४२ हजारांची रोकड लंपास

धरणगाव प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी गावात महामार्गावरील एस.पी. वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी शटर उचकटून ४२ हजार रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शॉपमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील ४२ हजार रुपये, ज्यात रोख रक्कम आणि चिल्लर यांचा समावेश होता, लंपास केले. यासोबतच त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला.यापूर्वीही चोरट्यांनी पाटा येथील भारत हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून किरकोळ चिल्लर आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरला होता.

मात्र, त्या चोरीची रक्कम कमी असल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता.एस.पी. वाईन शॉपच्या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पाळधीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाईन शॉपचे व्यवस्थापक भूषण जगताप यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक संदीप खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button