सव्वा तीन लाखांचे दागिने आणि रोकड घेऊन पोबारा
चाळीसगाव ;- शहरातील राजरत्न ज्वेलर्स मध्ये दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन अनोळखी महिलांनी ३ लाख २० हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची खळबळ जनक घटना १४ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली असून त्या तीन महिलांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, राजेश रमेश वर्मा वय ४२ रा. रथगल्ली चाळीसगाव हे व्यवसायाने सराफी व्यापारी असून १४ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या राजरत्न ज्वेलर्स येथे तीन अनोळखी महिला दागिने खरेदी कण्र्याच्या बहाण्याने आल्या असता राजेंद्र वर्मा यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या चॉकलेटी रंगाची बॅगमध्ये असलेले ४२ हजारांचे ७ ग्राम वजनाचे सोन्याच्या रिंगा , ६० हजार किमतीचे १० ग्राम वजनाचे मणी , ४८ हजर किमतीची ८ ग्राम वजनाची सोनसाखळी,२४ हजार किमतीचे ४ ग्राम विजांचे पेंडल ,१५ हजारांचे चांदीचे २०० ग्राम वजनाचे शिक्के ,जोडवे आदी ,आणि ९५ हजार रोख असा सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम एकूण ३ लाख २० हजारांचा ऐवज लंपास करून महिलांनी पळ काढला .
हा प्रकार लक्षात आल्यानंतर वार्ममा यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला धाव घेऊन तीन महिलांविरुद्ध फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहे.