मुंबई;- आझाद मैदानावर परवानगी नाकारल्याच्या कागदावर काही पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश असल्याचं सांगत सही केल्याचं त्यांनी म्हटले असून पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी आझाद मैदानाच्या दिशेने जाण्याचा निर्धार केला आहे.
मुंबईतील आझाद मैदान मराठा समाजाच्या आंदोलनासाठी पुरेसं नाही, तसंच मुंबईतलं कोणत्याही मैदानाची इतकी क्षमता नसल्याचं कारण देत पोलिसांनी जरांगेंच्या मोर्चासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कार्पोरेशन पार्क मैदानाचा पर्याय सुचवला होता. त्याची नोटीस त्यांना काल देण्यात आली.
कोर्टाचा निकाल आणला, मी न्यायालयाचा सन्मान करतो. न्यायालयाचं आहे, त्यांचा आदर करतो तर त्यावर सही करणं गरजेचं आहे म्हणून मी त्यावर सही केली. एक मराठी होतं आणि एक इंग्रजी होतं. मला मीडियाच्या माध्यमातून कळालं. मी होतो झोपेत. मला पुढे निघायचं होतं त्यामुळे गडबडीत वाचलंही नाही. मला वाचून दाखवता, मला न सांगता सही घेण्यात आली असं जरांगे पाटील म्हणाले.