खान्देशगुन्हेजळगांव

जुन्या वादातून एका तरुणाला बदडले !

जळगाव;- जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला एकाने शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील कडगाव येथील मरीमाता मंदिर परिसरात घडली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी की, मोहन आनंदा कोळी (वय-२४, रा. मरीमाता मंदिराजवळ, कडगाव ता. जि. जळगाव) हा तरुण कुटुंबासह राहायला असून शनिवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मोहन हा घरी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा गणेश बाबुराव कोळी याने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हाताला दुखापत करून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या मोहन कोळी याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारांचा दाखल करण्यात आले. याबाबत मोहन कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलियार खान हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button